भारत सरकारने भविष्य निर्वाह निधी योजना सुरु करण्यामागील मुख्य कारण, लोकांना बचतीची सवय लागावी .तसेच मध्यमवर्गातील लोकाना त्यांच्या उतार वयात त्यांचा जवळ भविष्याची गुंतवणूक म्हणूंन काही रक्कम मिळावी जेणेकरून त्यांच्या उतारवयात कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासू नये.
चला तर मग जाणुनि घेऊ भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीचे ठळक मुद्दे
१) भविष्य निर्वाह निधी खाते अर्थात पीपीफ खाते सदरचे खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडता येते उदा . भारतीय स्टेट बँक, अक्सिस बँक,पोस्टऑफिस इत्यादी
२) भविष्य निर्वाह निधी खाते कमीत-कमी पाचशे रुपये भरून उघडता येते .
३) सदरच्या खात्यावरती दरवर्षी जास्तीत-जास्त १,५०,०००/- रुपये भरता येतात.
४) सदरची १,५०,०००/- रक्कम तुम्ही वर्षाच्या सुरवातीला (१ एप्रिल ) किंवा त्या आर्थिक वर्षांमध्ये कधीही भरू शकता.
५) सदरच्या खात्यामध्ये तुम्ही दर महिन्याला सुद्दा काही रक्कम भरू शकता. पण वर्षांमध्ये जास्तीत -जास्त १,५०,०००/- इतकी रक्कम भरू शकता.
६) सदरचे खाते पंधरा वर्षाकरिता लॉक असते पण कोणत्याही आकस्मिक प्रसंगात सहाव्या वर्षी जमा केलेल्या रकमेच्या ८० टक्के रक्कम कर्ज म्हणून घेता येते.
७) कोणत्याही आकस्मिक प्रसंगात बँकेमधून वयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा पीपीफ खात्यामधून कर्ज घेता येते जेणेकरून व्याजाचा दर कमी होतो जसे कि वैयक्तिक कर्ज व्याज दर १७ टक्के व पीपीफ कर्ज व्याज दर ७. १० टक्के.
८) भारत सरकार दरवर्षी पीपीफ खात्याचा व्याज दर ठरवते. सन २०२१-२०२२ करीता ७. १० टक्के आहे.
९) सदरची योजना हि पूर्णपणे करमुक्त असून गुंतवणूक रक्कम आयकर मुक्त आहे.
१०) सदरचे खाते पंधरा वर्ष पूर्ण झालेनंतर पाच वर्षाकरिता वाढविता येते जसे कि १५+५=२०, २०+५=२५ वर्ष
११) सदरचा खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी पैसे भरावेत जेणेकरून जास्ती व्याज मिळेल किंवा दरवर्षी ५ एप्रिल पूर्वी एकरकमी भरावेत.
No comments:
Post a Comment